वाऱ्यावरची वरात (Varya Varchi Varaat Ep 01)

वाऱ्यावरची वरात (Varya Varchi Varaat Ep 01) वाऱ्यावरची वरातVARYA WARCHI VARAAT Ep 01वाऱ्यावरची वरात… हा विशेष कार्यक्रम.. काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा….VARYA WARCHI VARAAT – वाऱ्यावरची वरात..VARYA WARCHI VARAAT (Ep.01)DD SahyadriDoordarshan MumbaiSahyadri MarathiShow : वाऱ्यावरची वरात.. (भाग – ०१)Artist : पु.ल.देशपांडे

Published
Categorized as Videos

घुंघुंर

घुंघुंर आणि मध्यरात्री…..जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या एकच सारेमय दूरवर भुंकत होतानाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होतात्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.अधांराच्या दालनातूनतुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…पण मी नाही दचकलो…मी काय रातकिडा आहे? _ पु. ल. देशपांडे

Published
Categorized as Poems

फोटोतली तरुणी

फोटोतली तरुणी माझ्या खोलीतल्याफोटोतली तरूणी परवा मला म्हणाली‘मला चागंलेसे स्थळशोधून द्या ना-इथेमाझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’ _ पु. ल. देशपांडे

हल्ली पुर्वीसारखे माझा

हल्ली हल्ली पुर्वीसारखे माझाचेहरा टवटवीत दाखवणारेआरसे मिळेनासे झाले आहेत. _ पु. ल. देशपांडे

Published
Categorized as Poems

मी केलेला केक पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’

लक्षण मी केलेला केकपण ‘बकुळाबाईंनी पाठवला’ म्हटल्यावर, ‘बेकार आहे’ म्हणतअख्खा मटकवलाततेव्हाच मी तुमचं लक्षणओळखलं. _ पु. ल. देशपांडे

निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा

थ्यंक्यु निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळाएका अपुर-या चित्राला मदत करायला, काळ्या ढगाच्या दिशेने उडाला…मी त्या बगळ्याल्या ‘थ्यंक्यु’ म्हणालो. _ पु. ल. देशपांडे

Published
Categorized as Poems

पंचवीस मार्क कमी पडून नापास

पक्षनिष्ठा

पक्षनिष्ठा पंचवीस मार्क कमी पडून नापासझालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,‘मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.’

सुटका

सुटका बहात्तर कादबं-या लिहिणारीमाझी थोर साहित्यिक आत्या दम्यानेपंच्याहत्तराव्या वर्षी वारलीतेव्हा ‘सुटली’ म्हणायच्याऎवजी तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात… _ पु. ल. देशपांडे [By Pu La Deshpande] Pu La Deshpande – Purushottam Laxman Deshpande.(Born: 8 November 1919, Died: 12 June 2000)

Published
Categorized as Poems

वटसावित्री

वटसावित्री : १ ‘वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला‘ह्यां’ च्या समोरच्या बि-हाडातल्या बाईच्या जन्माला घाल….’ वटसावित्री : २ ‘वटेश्वरा, हेआज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलंसुत उद्या पहाटे मीउलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.तेव्हा आजचं सुत हे एक नुसतचंबंडल आहे हे ध्यानात ठेव.’

Published
Categorized as Poems