घुंघुंर


घुंघुंर

आणि मध्यरात्री…..
जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या

एकच सारेमय दूरवर भुंकत होता
नाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होता
त्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.
अधांराच्या दालनातून
तुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…
पण मी नाही दचकलो…
मी काय रातकिडा आहे?

_ पु. ल. देशपांडे