एक होती ठम्माबाई

एक होती ठम्माबाई 

एक होती ठम्माबाई 

तिला सोशल वर्कची घाई 

रात्रंदिवस हिंडत राही 

पण वर्कच कुठे उरले नाही

वर्क थोडे बाया फार 

प्रत्येकीच्या घरची कार 

नोकर – शोफर – बेरा – कुक 

घरात आंबून चालले सुख

घराबाहेर दुःख फार 

करीन म्हणते हलका भार 

कार घेऊन निघते रोज 

हरेक दुःखावरती डोज –

पाजीन म्हणतेः पिणार कोण ?

सगळ्या जणीना करते फोन 

मला कराल का हो मेंबर?”

“अय्या साॅरी, राग नंबर !”

सगळ्या मेल्या मारतात बंडल

म्हणुन स्वतः काढते मंडळ ।

,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *