चला जाऊ द्या पुढे काफिला


चला जाऊ द्या पुढे काफिला
अजुनी नाही मार्ग संपला

इथेच टाका तंबू…

जाताजाता जरा विसावा
एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू…

थोडी हिरवळ थोडे पाणी
मस्त त्यात ही रात चांदणी
उतरा ओझी विसरा थकवा
सुखास पळभर चुंबू
इथेच टाका तंबू…

अंग शहारे जशी खंजिरी
चांदहि हलला हलल्या खजुरी
हलल्या तारा हलला वारा
नृत्य लागले रंगू
इथेच टाका तंबू…

निवल्या वाळूवरी सावली
मदमस्तानी नाचु लागली
लयीत डुलती थकली शरीरें
नयन लागले झिंगू
इथेच टाका तंबू…