मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात
मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात 

म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त.

इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे 

आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे 

बोलणे आ इथला धर्म आहे 

आणि ऐकणे हा दानधर्म आहे.

म्हणून वक्ते उपदेश करतात 

आणि स्रोते उपकार करतात.

उपचारांना मात्र जागा नाही

कवीता फाडण्याच्या मंत्र 

दोन टोके पानांची 

दोन चिमटी बोटांच्या 

एक कागद गाण्याच्या 

दुसरे दिवशी वाण्याच्या 

मोडा तोडा ओढा 

एक दऊत फोटो 

एक पाय खुर्चीचा 

एक पाय टेबलाचा 

दोन घाव घाला 

कवी खाली आला 

गाणे चोळामोळा 

पावसात जाऊन खेळा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *