इवल्याइवल्याशा

इवल्याइवल्याशाटिकल्याटिकल्यांचेंदेवाचे घर बाई, उंचावरीऐक मजा तर ऐक खरी निळीनिळी वाटनिळेनिळे घाटनिळ्यानिळ्या पाण्याचेझुळुझुळु पाटनिळ्यानिळ्या डोंगरांतनिळीनिळी दरी चांदीच्या झाडांनासोन्याची पानेंसोनेरी मैनेचेंसोनेरी गाणेंसोन्याची केळींसोन्याचा पेरूसोनेरी आंब्यालासोन्याची कैरी देवाच्या घरातगुलाबाची लादीमऊमऊ ढगांचीअंथरली गादीचांदण्याची हंडीचांदण्याची भांडीचांदोबाचा दिवा मोठालावला वरी

Published
Categorized as Poems

आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो.

आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री  तुम्ही का जगायचे  हे सांगून जाईल.

भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो आणि रिकामा रिखसा जगातील ” माणसं ” दाखवतो.  ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं,  त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. “विचित्र आहे पण सत्य आहे” आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर…!! जगायला गंमत आणि… Continue reading भरलेला खिसा माणसाला ” जग ” दाखवतो

शब्दावाचुन कळले सारे

शब्दावाचुन कळले सारे

शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला  छंद नवा अन् ताल निराळा  त्या दिवशी का प्रथमच माझे  सूर सांग अवघडले  शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले आठवते पुनवेच्या रात्री  लक्ष दीप विरघळले गात्री  मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले  शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या… Continue reading शब्दावाचुन कळले सारे

च्यालेंज

च्यालेंज

अहो ज्ञानियांच्या राजा । कशाला फुकाच्या गमजा? एकेकाळी रचीली ओवी । व्हाल का हो नवकवी? मारे बोलवीला रेडा । रेघ बी. ए. ची ओलाडा! तुम्ही लिहावी विराणी । लिहा पाहू फिल्मी-गाणी  म्हणे आळंदी गावात । तुम्ही चालवली भितं चालवून दावा झणी एक नाटक कंपनी बाप रखुमादेवीवरा । आमुचा च्यालेंज स्विकारा

मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलो

मी एकदा आळीत गेलोचाळ घेऊन बाहेर आलोतोंडात भरली सगळी चाळमी तर मुलाखाचा वाचाळकधी पायांत बांधतो चाळउगीच नाचतो सोडून ताळवजन भारी उडते गाळणपायांचीहि होते चाळणगाळणे घेऊन गाळतो घामचाळणीमधून चाळतो दामचाळीबाहेर दुकान माझेविकतो तेथे हंसणे ताजे‘ खुदकन् हसू ’ चे पैसे आठ‘ खो खो खो ’ चे एकशे साठहसवण्याचा करतो धंदाकुणी निंदा – कुणी वंदाकुणाकुणाला पडतो पेचह्याला… Continue reading मी एकदा आळीत गेलो

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात

मी राहतो पुण्यात  म्हणजे विद्वत्तेच्या ‘ठाण्या’त. इथल्या मंडईचे देखील विद्यापीठ आहे  आणि विद्यपीठाची मंडई झाली आहे  बोलणे आ इथला धर्म आहे  आणि ऐकणे हा दानधर्म आहे. म्हणून वक्ते उपदेश करतात  आणि स्रोते उपकार करतात. उपचारांना मात्र जागा नाही कवीता फाडण्याच्या मंत्र  दोन टोके पानांची  दोन चिमटी बोटांच्या  एक कागद गाण्याच्या  दुसरे दिवशी वाण्याच्या  मोडा तोडा… Continue reading मी राहतो पुण्यात

एक होती ठम्माबाई

एक होती ठम्माबाई 

एक होती ठम्माबाई  तिला सोशल वर्कची घाई  रात्रंदिवस हिंडत राही  पण वर्कच कुठे उरले नाही वर्क थोडे बाया फार  प्रत्येकीच्या घरची कार  नोकर – शोफर – बेरा – कुक  घरात आंबून चालले सुख घराबाहेर दुःख फार  करीन म्हणते हलका भार  कार घेऊन निघते रोज  हरेक दुःखावरती डोज – पाजीन म्हणतेः पिणार कोण ? सगळ्या जणीना… Continue reading एक होती ठम्माबाई

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Published
Categorized as General