Category: Poems

  • नवरा आणि नारळ – पु.ल.देशपांडे.

    नवरा आणि नारळ – पु.ल.देशपांडे.

    नवरा आणि नारळकसे निघतील ते नशीबच जाणेअसं आजी म्हणायची.बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही.दोन्हीही कसेही निघाले तरी‘पदरी पडले, पवित्र झाले’.दोघांनाही देवघरात स्थान,दोघेही पुज्य. पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेरमद्रासीअण्णाच्या गादीवरनारळ रचून ठेवलेले असायचे.हल्ली ऑन लाईन साईटवरसगळ्या किमतीचे नवरेअसेच रचून ठेवलेले असतात. नारळ म्हटलं कि मला धडधडतं .चांगला ओळखायचा कसा ?मी उगाचच कानाजवळ नेऊनहलवून वगैरे बघत असे. अण्णाला…

  • घुंघुंर

    घुंघुंर

    घुंघुंर आणि मध्यरात्री…..जेव्हा तारका खेळून दमल्या नव्हत्या एकच सारेमय दूरवर भुंकत होतानाक्यावरच्या पोलीस डुलक्या घेत होतात्या वेळी तुझे घुंघुंर ऎकू आले.अधांराच्या दालनातूनतुझ्या घुंघूंराच्या नादाने रातकिडे दचकले…पण मी नाही दचकलो…मी काय रातकिडा आहे? _ पु. ल. देशपांडे

  • फोटोतली तरुणी

    फोटोतली तरुणी

    फोटोतली तरुणी माझ्या खोलीतल्याफोटोतली तरूणी परवा मला म्हणाली‘मला चागंलेसे स्थळशोधून द्या ना-इथेमाझा जीव टांगल्यासारखं वाटतंय’ _ पु. ल. देशपांडे

  • हल्ली पुर्वीसारखे माझा

    हल्ली पुर्वीसारखे माझा

    हल्ली हल्ली पुर्वीसारखे माझाचेहरा टवटवीत दाखवणारेआरसे मिळेनासे झाले आहेत. _ पु. ल. देशपांडे

  • मी केलेला केक पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’

    मी केलेला केक पण ‘बकुळाबाईंनी पाठवला’

    लक्षण मी केलेला केकपण ‘बकुळाबाईंनी पाठवला’ म्हटल्यावर, ‘बेकार आहे’ म्हणतअख्खा मटकवलाततेव्हाच मी तुमचं लक्षणओळखलं. _ पु. ल. देशपांडे

  • निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा

    निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळा

    थ्यंक्यु निळ्या तळ्याच्या काठावरचा बगळाएका अपुर-या चित्राला मदत करायला, काळ्या ढगाच्या दिशेने उडाला…मी त्या बगळ्याल्या ‘थ्यंक्यु’ म्हणालो. _ पु. ल. देशपांडे

  • पंचवीस मार्क कमी पडून नापास

    पंचवीस मार्क कमी पडून नापास

    पक्षनिष्ठा पंचवीस मार्क कमी पडून नापासझालेले चिरंजीव तिर्थरूपांना म्हणाले,‘मी पहिल्यापासूनच मार्क्सविरोधी गटात आहे.’

  • सुटका

    सुटका

    सुटका बहात्तर कादबं-या लिहिणारीमाझी थोर साहित्यिक आत्या दम्यानेपंच्याहत्तराव्या वर्षी वारलीतेव्हा ‘सुटली’ म्हणायच्याऎवजी तुम्ही ‘सुटलो’ म्हणालात… _ पु. ल. देशपांडे [By Pu La Deshpande] Pu La Deshpande – Purushottam Laxman Deshpande.(Born: 8 November 1919, Died: 12 June 2000)

  • वटसावित्री

    वटसावित्री

    वटसावित्री : १ ‘वटेश्वरा, पुढल्या जन्मोजन्मी मला‘ह्यां’ च्या समोरच्या बि-हाडातल्या बाईच्या जन्माला घाल….’ वटसावित्री : २ ‘वटेश्वरा, हेआज तुझ्या बुध्यांला गुंडळलेलंसुत उद्या पहाटे मीउलंटं फिरवून घरी परत नेणार आहे.तेव्हा आजचं सुत हे एक नुसतचंबंडल आहे हे ध्यानात ठेव.’

  • आताशा बुडणा-या सुर्याला ‘बराय उद्या भेटू’

    आताशा बुडणा-या सुर्याला ‘बराय उद्या भेटू’

    प्रश्न आताशा बुडणा-या सुर्याला‘बराय उद्या भेटू’ असे म्हणाला की तो मला म्हणतो,‘कशावरून?मधल्या रात्रीचीतुला अजूनही इतकी खात्री आहे?‘सुर्य आता म्हातारा झालाय.’