Skip to content

शब्दावाचुन कळले सारे

शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले

प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला 

छंद नवा अन् ताल निराळा 

त्या दिवशी का प्रथमच माझे 

सूर सांग अवघडले 

शब्दावाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले

आठवते पुनवेच्या रात्री 

लक्ष दीप विरघळले गात्री 

मिठीत तुझिया या विश्वाचे

रहस्य मज उलगडले 

शब्दावाचुन कळले सारे, , शब्दांच्या पलिकडले

Published inPoemsसाहित्य